‘बिग बॉस’च्या सेटला आग

‘बिग बॉस’च्या सेटला आग

Published on

मुंबई, ता. १३ : गोरेगाव चित्रनगरीमधील हिंदी ‘बिग बॉस’च्या सेटला रविवारी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग दोन तासांनी विझवण्यात आली. आगीत कोणीही जखमी झालेले नाही. सेटवरील वायरसह लाकडी साहित्य जळून खाक झाले. आग लागली तेव्हा सेटवर कोणीही उपस्थित नव्हते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या मदतीने आग विझवली. ज्वलनशील साहित्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास आग नियंत्रणात आली, असे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. ‘बिग बॉस’चा सेट पाच हजार चौरस फुटावर पसरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच शोच्या अंतिम भागाचे शूटिंग झाले होते. अभिनेता सलमान खान शोचा होस्ट आहे. चित्रनगरी परिसरात अनेक मालिका आणि सिनेमांचे शूटिंग सुरू असते. तेथे मोठ्या प्रमाणात लाकडी वा इतर ज्वलनशील साहित्य वापरले जात असल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न नेहमीच निर्माण होत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com