मुंबई : कोरोनायोद्धांना दोन हप्त्यांत मिळणार १,२१,००० रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Covid
कोरोनायोद्धांना मुंबई महापालिकेचा दिलासा

मुंबई : कोरोनायोद्धांना दोन हप्त्यांत मिळणार १,२१,००० रुपये

मुंबई, ता. १५ : दोन वर्षांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरांना त्यांच्या योगदानाबद्दल ॠणनिर्देश म्हणून सव्वा लाखांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका २६ कोटी ७ लाख ५५ हजार रुपये खर्च करणार आहे.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' नोकऱ्यांकडे वाढला कल, गुगल सर्चमध्ये स्पष्ट

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोना योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांवर उपचार केले. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना अनेक निवासी डॉक्टरदेखील बाधित झाले. कोरोनामुक्त झाल्यावर लगेचच ते पुन्हा रुग्णसेवेत परतले. आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या दोन हजार १५५ निवासी डॉक्टरांना ॠणनिर्देश म्हणून एक लाख २१ हजार रुपये ही रक्कम दोन हप्त्यांत म्हणजेच जानेवारी व मार्च महिन्यात देण्यात येणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

निवासी डॉक्टरांची आकडेवारी!
केईएम रुग्णालय - १०५५
सायन रुग्णालय - ६०४
नायर रुग्णालय - ४९१
कूपर रुग्णालय - ५
------------------------------
एकूण - २१५५

हेही वाचा: तुम्हाला कोरोना होऊन गेलाय ? तर ही बातमी तुमच्यासाठीच ;पाहा व्हिडीओ

ऑक्टोबर महिन्यात केलेल्या संपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांना ॠणानुबंध बक्षीस देण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय निवासी डॉक्टरांना या आठवड्यात निम्मी रक्कम मिळाली आहे. पालिकेच्या डॉक्टरांना मार्च महिन्यात उर्वरित रक्कम दिली जाणार आहे.
- डॉ. अविनाश दहिफळे, अध्यक्ष, केंद्रीय मार्ड संघटना

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top