mobile hacking crime
mobile hacking crimesakal news

नवी मुंबई : तरुणीचा मोबाईल हॅक करणाऱ्यावर गुन्हा

नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या धीरज म्हात्रे नावाच्या तरुणाने आपल्या ओळखीतील तरुणीच्या मोबाईल हॅक (Mobile hack crime) करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिस ठाण्यात (uran police station) म्हात्रे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तरुणी (२४) उरणमध्ये कुटुंबासह राहत असून खासगी कंपनीत कामाला आहे. तरुणीच्या चुलत भावाचा मित्र धीरज म्हात्रे हा नेहमी तिच्या घरी जायचा. त्यांचे मोबाईलवरही बोलणे व्हायचे. २३ जानेवारी रोजी धीरजने तरुणीच्या व्हॉट्सऍपवर (Whats app) एपीके स्नॅपचॅट लिंक पाठवून ती सुरू करण्यास सांगितले.

तरुणीने लिंक उघडली. दुसऱ्या दिवशी एका हॅकरने तरुणीला संपर्क साधून धीरजने पाठविलेल्या स्नॅपचॅटच्या लिंकबाबत विचारणा केली. तसेच धीरजने त्याला पैसे देऊन तिचा मोबाईल हॅक करण्यास सांगितल्याची माहिती दिली. तसेच स्नॅपचॅटची लिंक मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याचे व ४८ तासानंतर मोबाईलमध्ये ॲक्‍टिवेट होत असल्याचे सांगितले. तरुणीने याबाबत भावाला माहिती देत मोबाईलमधील स्नॅपचॅटची लिंक डिॲक्टीवेट केली. आणि धीरजविरोधात उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

एपीके स्नॅपचॅट लिंक इन्स्टॉल केल्यास मोबाईलमधील सर्व माहिती व डेटा मोबाईल हॅक करणारा व्यक्‍तीला येतो. तसेच मोबाईलमधील सर्व वैयक्‍तिक व खासगी डेटा हॅकरला त्याच्या मोबाईलवर बघता येते. मोबाईल बंद असला तरी त्यातील कॅमेरा व मायक्रो फोनचा ॲक्सेस हॅकरला मिळतो. त्यामुळे तो आपल्या सर्व गोष्टी पाहू व ऐकू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com