
खारघर प्राथमिक नागरी केंद्रात बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत
पनवेल, ता. १५ (प्रतिनिधी) : खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तसेच विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन मंगळवारी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, नगरसेवक नीलेश बावीस्कर, प्रभाग ‘अ’च्या सभापती संजना कदम, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहे. यामध्ये ओपीडी अंतर्गत डॉक्टर, विशेष तज्ज्ञांकडून सल्ला, प्रसूतीपूर्व सेवांतर्गत दर बुधवारी गरोदर मातांची तपासणी, प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन, किरकोळ रोगांची बाह्य रुग्ण सेवा, टी.बी. कुष्ठरोग, यासारख्या रोगांची तपासणीस सुरुवात केली
नवजात अर्भक व नवजात शिशूंसाठी आरोग्य सेवा, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा या अंतर्गत बाल्यावस्था व किशोरवयीन सेवा, कुटूंब नियोजन गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य तपासणी, वाढत्या वयातील आजार व उपचार, टिळक विद्यापीठाच्या डॉक्टरांच्या माध्यामातून फिजिओथेरपी दिली जाणार आहे. तसेच रक्त तपासणी, थायरॉईड, मलेरिया, डेंगी, एचआयव्ही आदी चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन विविध सर्वेक्षण करीत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..