चौपदरीकरण आले, पण केंबुर्लीचे पाणी गेले!
महाड, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम रडतरखडत सुरू आहे. पावसाळ्यात या महामार्गासाठी तयार होत असलेल्या सेवा मार्गात मातीचे ढिगारे कोसळल्याच्या घटना घडल्या. परंतु, मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणामुळे तालुक्यातील केंबुर्ली गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
महाड शहरापासून तीन किमी अंतरावरील केंबुर्ली गावात गेली काही वर्षे पाणीटंचाई भेडसावत आहे. महिलांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. जलवाहिनीच्या झडपांमधून पडणारे पाणी भरण्यासाठी घागरी आणि हंडे घेऊन महिला येथे होत्या. मात्र, सध्या चौपदरीकरणामुळे या परिसरातील गावांना पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जागोजागी उखडल्याने गावात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने याकडे स्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. टंचाईचा मोठा फटका वृद्ध महिलांना बसत आहे. याप्रकरणी संतप्त झालेल्या येथील मोहल्ल्यातील महिलांनी आज एकत्रित येत महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय महिलांनी गावामध्ये होत असलेल्या पाणीटंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच पाणी समस्येवर तोडगा काढत नसल्याने सरपंचावर देखील संताप व्यक्त केला.
...
कंत्राटदार कंपनीकडे दुरुस्तीची मागणी
कोतुर्डे धरणातून सोडले जाणारे पाणी मोहोप्रे येथून जॅकवेल द्वारे उपसा करून केंबुर्ली आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. महामार्ग चौपदरीकरणात ही जलवाहिनी जागोजागी तोडण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलवाहिन्या जोडण्याचे काम दोनदा केले. परंतु, महामार्ग रुंदीकरणात वाहिन्या पुन्हा तुटल्या. त्यामुळे आता एल अँड टी कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ अखलाक घोले यांनी केली आहे.
...
महामार्गाच्या रुंदीकरणात बाधीत होत असणारी पाईपलाईन दोन वेळा दुरुस्त करण्यात आली.परंतु, रुंदीकरणात सुसूत्रता नसल्याने वाहिन्या वारंवार फुटत आहे
-जगदीश फुलपगारे, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.