Environment
EnvironmentSakal

डहाणूतील पर्यावरण धोक्याच्या उंबरठ्यावर! वृक्षांची कत्तल मुळावर

विविध विकासकामांसाठी उत्खनन

डहाणू : डहाणू तालुक्यातून (Dahanu) मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmadabad) जलद महामार्ग असे प्रकल्प जात असल्याने त्याच्या भरावाची कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर माती, दगड, मुरूम उत्खनन करण्यात येत असून, कॉरिडॉर रेल्वे लाईन (Corridor Railway line) टाकण्यासाठी हजारो मोठमोठ्या वृक्षांची तोड करण्यात आल्याने डहाणूतील पर्यावरण धोक्याच्या उंबरठ्यावर येऊ लागले आहे.

Environment
नवी मुंबईतील अपघातांत २६९ मृत्‍यू; दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक

केंद्र सरकारच्या २० जून १९९१ च्या अधिसूचनेप्रमाणे डहाणू तालुका हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील भाग आहे. येथील पर्यावरणाचे रक्षण डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाद्वारे केले जाते. रेल्वेच्या डीएफसीसी भरावासाठी आसनगाव, जामशेत, वाणगाव, चरी, कोटबी, वसंतवाडी येथून बेकायदा माती, मुरूम, दगड, उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू असते.

अशाचप्रकारे रॉयल्टीपेक्षा तब्बल तीन हजार ५०० ब्रास माती, मुरुमाचे अधिक उत्खनन केल्याप्रकरणी सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या पथकाने चरीकोटबी येथे धाड टाकून एका महिन्यात चार कोटींचा महसूल वसूल केला आहे; तर डीएफसीसी रेल्वेलाईन टाकण्यासाठी डहाणूतून हजारो मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली. त्यात काही १००-२०० वर्षांपूर्वीच्या वृक्षांचाही समावेश होता.

Environment
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’; जानेवारीत एक हजार मुलांची केली घरवापसी

सध्या बुलेट ट्रेन आणि मुंबई-अहमदाबाद जलद महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर त्यासाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. समुद्राच्या भरतीचे पाणी पसरणाऱ्या हजारो एकर खाजण जमिनी सरकारने कोळंबी उत्पादनासाठी दिल्या. त्या जमिनी विकसित करण्यासाठी समुद्र खाडीतील दूषित पाणी शुद्ध करणाऱ्या असंख्य तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे आधीच भरतीचे पाणी मानवी वस्त्यांमध्ये शिरत असताना कोळंबी प्रकल्पामुळे अडणारे समुद्राच्या भरतीचे पाणीदेखील मानवी वस्त्यांकडे वळल्याने किनारी भागात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मत्स्यबीज उत्पादनावर परिणाम

डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील बेकायदा रेती आणि समुद्रातील लहान दगडांची वाहतूक करून चोरट्यांनी डोंगराप्रमाणे समुद्राचा खडकाळ भाग (पगार) उघडा केला आहे. त्यामुळे मासे लपण्याच्या जागा नष्ट झाल्याने मत्स्यबीज उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. किनाऱ्यावरील सुरुच्या बागाही नष्ट होऊ लागल्यामुळे पर्यावरणावर त्याचा अनिष्ट परिणाम झाला आहे.

डहाणूच्या पर्यावरण रक्षणासाठी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अस्तित्वात आहे, परंतु रेल्वे फ्रेट कॉरिडॉर, बुलेट ट्रेन आणि मुंबई-अहमदाबाद जलद महामार्ग प्रकल्पाच्या माती, मुरूम भरावासाठी डोंगर पोखरण्याबरोबरच हजारो वृक्षतोडीची कत्तल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

- सुरेंद्र पाटील, कृषितज्ज्ञ, डहाणू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com