
शिवाजी पार्क मधील खडीवर विटांचा उपाय
मुंबई, ता. २० : दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पर्जन्यजल संधारण प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी मैदानाच्या मध्यभागी खडी टाकली जात असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, ही खडी मैदानाच्या मधून सिमेंटचा रस्ता बांधण्यासाठी टाकली जात असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला होता. त्यानंतर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली.
शिवाजी पार्क मैदानात पर्जन्यजल संधारण प्रकल्पातून मिळणारे पाणी मैदानातील धूळ उडू नये म्हणून नियमित मैदानात वापरण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी मैदानाच्या मध्यभागी खडी टाकली जात आहे. त्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपासून हा वादही सुरू आहे. मैदानाच्या मधोमध रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांच्या निवासस्थानी स्थानिकांच्या उपस्थितीत ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरही उपस्थित होते. त्यांनी खडी टाकण्याचे कारण सांगितले. मात्र, नागरिकांचे समाधान झाले नाही. दगडाच्या खडीऐवजी विटांचे तुकडे वा मुरूम टाकावा, असे दोन पर्याय पालिकेला सुचविण्यात आले आहेत. त्यावर सल्लगाराशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन पालिकेने दिल्याचे समजते.
...
आंतरराष्ट्रीय पद्धत
मैदानात पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबविण्याची ही आंतरराष्ट्रीय पद्धत आहे. हा रस्ता मातीचाच असेल. त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खडी टाकण्यात आली आहे. ही पद्धत कुठल्याही आंतरराष्ट्रीय मैदानाखाली पाणी वाहून नेण्याच्या व्यवस्थेसाठी वापरली जाते, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..