Raju-Patil-MNS
Raju-Patil-MNSsakal media

पक्ष सोडून गेलेल्यांना पाहून घेईल; आमदार राजू पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

Published on

डोंबिवली : महापालिका निवडणुकीच्या (kdmc election) तोंडावर पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मनसे (mns) पक्षातील कार्यकर्ते फुटण्याआधीच आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. पक्ष सोडून कोणी जात नाही, जाणारदेखील नाही आणि सोडून गेलेल्यांना मी पाहून घेईल, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

Raju-Patil-MNS
पनवेल महापालिका क्षेत्रात १०० टक्के लसीकरण; ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत शिबिरे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदारा राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात रविवारी मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या वेळी मनसे पदाधिकारी मनोज घरत, प्रकाश भोईर, इरफान शेख, हर्षद पाटील, मंदा पाटील, अरुण जांभळे, संदीप म्हात्रे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान जवळपास विविध भागांतील ८०० कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्यासूचना दिल्या. बदललेल्या प्रभाग रचनेनुसार त्या प्रभागात जाऊन आता काम करावे लागेल, असेदेखील ते म्हणाले.

आपल्याला भीती नाही या भ्रमात राहू नका

पाटील इतर राजकीय पक्षांना उद्देशून म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण करू नका. आम्हालादेखील ते करता येते. मनसे पक्ष सोडून गेलेले भोंगे लोकसभा निवडणुकीत विकले गेले होते. माझीपण आमदारकी त्यांनी विकली असती. त्यामुळे त्यांना माझ्या क्षेत्रात मी फिरकू दिले नाही. ज्यांनी पैसे घेऊन राज ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे त्यांना सोडणार नाही. मोठ्या पक्षात गेल्याने आता आम्हाला कोणाची भीती नाही या भ्रमात त्यांनी राहू नये. तुमचा पक्ष आताच घाबरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com