Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

पनवेल महापालिका क्षेत्रात १०० टक्के लसीकरण; ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत शिबिरे

पनवेल : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात (corona vaccination) पनवेल महापालिकेने आघाडी (Panvel municipal corporation) घेतली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १०० टक्के लसीकरणामुळे प्रशासनाचे कौतुक होत आहे. राज्य सरकारच्या (Maharashtra government) निर्देशानुसार १६ जानेवारी २०२१ रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे (Health Authorities) लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे यामध्ये पोलिस विभाग, महसूल विभाग आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Corona Vaccination
नवी मुंबई: अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर या मोहिमेने वेग घेतला. लसीकरण अधिक प्रमाणात करण्यासाठी ७९ खासगी रुग्णालयांना अर्बन टास्क फोर्स अंतर्गत मान्यता देऊन जवळपास १५० खासगी लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील लसीकरण व मोठ्या सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण झाले. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत महापालिका क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात आली.

शहरी भागात २५ लसीकरण केंद्रे सुरू असून ग्रामीण भागात ३० ठिकाणी आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान ज्या नागरिकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण राहिले आहे. त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी सातत्याने केले होते. या प्रयत्नांमुळे महापालिकेचे दुसऱ्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकले.

Corona Vaccination
अंबरनाथ: आर्थिक संकटाच्या भीतीमुळं दोन महिन्याच्या मुलीचा सौदा; पालकांवर गुन्हा

पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरणावर महापालिका भर देत असून पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये शिबिरे लावण्यात येत आहेत. लसीकरणासाठी सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहे. वर्धक मात्राही देण्यात येत आहे. आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योद्धे तसेच व्याधीग्रस्त असणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिक यांना ‘प्रिकॉशन डोस’ देण्यात येत आहे. ९ ते ५ या वेळेत प्रिकॉशन डोस सहा सहा लसीकरण केंद्रावर विनामूल्य देण्यात येत आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण

एकूण लोकसंख्या ८,१४,०००
लाभार्थी ५,९८,१२७
पहिली मात्रा ६,८०,४७८
पहिली मात्रा ( टक्के) ११३.७७%
दुसरी मात्र ६,०६,१७०
दुसरी मात्रा (टक्के) १०१.३४%
वर्धक मात्र १,४४,७८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com