vasai Virar
vasai VirarGoogle

वसई-विरार कचराकुंडी मुक्त होणार; रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई

वसई : वसई-विरार शहर (vasai-virar city) कचकुंडीमुक्त होणार आहे. यापुढे नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडनीय कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून (Solid waste management) अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच वसई-विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हजारो कचराकुंड्या (Trash) महापालिकेकडून उचलल्या जाणार आहेत.

vasai Virar
पनवेल : महागड्या दुचाकीची पोलिसांना भुरळ; तपासणीनंतर चक्क फोटोसेशन

वसई-विरार पालिकेच्या क्षेत्रात ७०० टन कचरा रोज उचलला जातो. वसई पूर्वेकडील कचराभूमीवर जमा केला जातो. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत जेणेकरून शून्य कचरा मोहीम राबवता येईल; परंतु सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या कचराकुंड्यात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो व दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढत असते. अनेकदा नागरी वस्तीतील कचरा उचलला जात नाही.

त्यामुळे प्रदूषण व आरोग्याचा प्रश्न उद्भवत असतो. नागरिकांना होणारा त्रास पाहता व शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात कचराकुंडीमुक्तीचा निर्णय घेतला आहे.
व्यापारी, दुकानदार, प्रवासी हे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असतात. त्याकरिता महापालिकेने कचराकुंड्यांची व्यवस्था केली आहे; परंतु यापुढे कचराकुंडीमुक्त शहर बनविण्यासाठी प्रशासनाने शास्वत पाऊल उचलले असून शहरामध्ये ओला व सुका कचरा टाकण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच कचराकुंड्या बसविण्यात येणार असून त्याच ठिकाणी कचरा टाकण्यास परवानगी मिळणार आहे.

vasai Virar
पक्ष सोडून गेलेल्यांना पाहून घेईल; आमदार राजू पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

त्यामुळे या मोहिमेला नागरिक, दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते यांना स्वतःच्या कचराकुंड्या ठेवाव्या लागणार आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्या पूर्णपणे उचलल्यावर महापालिकेच्या नऊ प्रभागांत स्वच्छता बिट मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.
कचरा भिरकावणारे तसेच रस्त्यावरील विक्रेते, दुकानदार यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार असून जर नियमाचे उल्लंघन केले, तर २०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या कचराकुंड्या हटवल्या जाणार आहेत. घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंड आकारला जाणार आहे.
- नीलेश जाधव, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com