Hardeep singh puri
Hardeep singh purisakal media

ठाणे पालिकेची चौकशी सुरू; १५० कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा भाजपचा आरोप

ठाणे : ठाणे महापालिका (Thane Municipal corporation) स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील (Smart city project) नवनवीन घोटा‌ळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep singh puri) यांनी चौकशी सुरू केली असतानाच, या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना (shivsena) आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना १५० कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेला नुकतेच पत्र पाठवून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष सुजय पत्की (Sujay Patki) यांनी दिली आहे.

Hardeep singh puri
मुंबईत सर्व न्यायालयांत लोकअदालतीचे आयोजन; प्रकरणे तडजोड करून मिटविण्‍याची मुभा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मोठे प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्प, कोपरी येथील सॅटीस पूल, गावदेवी मैदान येथे वाहनतळ तयार करणे अशा काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाला असून याप्रकरणी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशी सुरू केली आहे. असे असतानाच या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे, असा आरोप भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी केला आहे.

भाजप नेत्यांचा पाठपुरावा

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे करून विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ७ डिसेंबरला केंद्रीय नगरविकास खात्यातर्फे एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हरदीपसिंह पुरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत ६ जानेवारीला केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशनकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला पत्र पाठविण्यात आले होते.

परंतु या विभागाने पत्रानुसार काहीच कारवाई सुरू केली नव्हती. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे ठाणे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने ठाणे महापालिकेला नुकतेच पत्र पाठवून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com