शिष्यवृत्ती : २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, या संकेतस्थळावर सादर करता येतील अर्ज

Exam
Examsakal
Published on

शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) या योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण मुंबई विभागाच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करू न शकलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज, तसेच जुन्या अर्जांचे नूतनीकरण करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरावेत. या योजनेसाठी सरकारने पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून मुंबई विभागातील विद्यार्थी, पालक तसेच संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तात्काळ नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Politics Congress NCP Clash Intensifies Over Sunetra Pawar Gungi Gudiya Social Media Controversy
School Education Department Maharashtra Regularises 3276 Samagra Shiksha Contract Workers 38 Employees Left Out
Western Railway introduces thermal ticket printing, raising concerns over ticket durability.
Drugs Smuggler Arrested In Navi Mumbai
Marathi News Esakal
www.esakal.com