panvel municipal corporation
panvel municipal corporationgoogle

मालमत्ता कराचा बोजा नको; पनवेल पालिकेतील विरोधी पक्षाची मागणी

पनवेल : महापालिकेच्या (Panvel municipal corporation) मालमत्ता कराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. मात्र त्यानंतरही १ एप्रिलपासून वेळेत कर न भरलेल्या नागरिकांना दंड स्वरूपात शास्ती लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला. याबाबत शेकापचे आमदार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह पालिका आयुक्त गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांची बुधवारी ( ता.२४) भेट घेतली. या वेळी त्यांनी शास्ती लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली.

panvel municipal corporation
दुबईत नोकरीच्या निमित्ताने फसवणूक; इस्लामउद्दीन अन्सारी गजाआड

महापालिका प्रशासन मालमत्ता कर लावण्याबाबत ठाम आहे. विशेष म्हणजे वेळेत कर न भरल्यास नागरिकांवर थकीत करासह दंड देखील भरावे लागणार असल्याने पनवेल पालिका हद्दीत राजकारण पुन्हा तापणार आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेला मालमत्ता कराचा तिढा सुटताना दिसत नाही. राजकीय पक्षांचे नेते नागरिकांना मालमत्ता कर भरू नका. या संदर्भात राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन देत आहेत.

यामुळे नागरिकांच्या डोक्यावर मालमत्ता करासह शास्तीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त बोजा पडू नये म्हणून बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील, अरविंद म्हात्रे, गोपाळ भगत, गणेश कडू, प्रीती जॉर्ज म्हात्रे, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, प्रिया पाटील आदींनी आयुक्तांची भेट घेत शास्तीचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com