वीज कर्मचाऱ्यांचा ९ मार्चला
खाजगीकरणाविरोधात मोर्चा

वीज कर्मचाऱ्यांचा ९ मार्चला खाजगीकरणाविरोधात मोर्चा

Published on

मुंबई, ता. ११ : केंद्र व राज्य सरकारच्या विद्युत क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण आणि इतर धोरणाविरोधात वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीतरर्फे ९ मार्च रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच २६ संघटनाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारी (ता. २५) राज्यभर वीज कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर द्वारसभा, निदर्शने करण्यात येणार आहेत.

चंडीगड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविरोधात तेथील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपाला वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. तसेच विद्युत कायदा २०२१ येण्यापूर्वी खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला विरोध करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारी द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे. तसेच महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यात सुरू करण्यात येत असलेले खासगीकरण, वरिष्ठ पदावरील भरती, बदल्या यातील राजकीय हस्तक्षेप याविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने संपावर जाण्याची नोटीस ऊर्जामंत्र्यांना दिली होती. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने समितीमार्फत ९ मार्च रोजी मुंबईत विशाल मोर्चा काढण्याचा इशारा दिला असल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com