
इकबाल मलिक यांना ईडीची नोटीस
चेंबूर, ता. २४ (बातमीदार) ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली असताना त्यांचा भाऊ इकबाल मलिक यांना आज नोटीस देऊन उद्या चौकशी करिता ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे.
दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्या कंपनीकडून कुर्ला येथील गोवावाला कंपाउंट एकूण २.८० एकर जमीन कवडी मोलाच्या भावाने खरेदी केल्याप्रकरणी बुधवारी ईडीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर पहाटे धाड मारून त्यांना अटक केली असताना ईडीने हे सत्र सुरू ठेवले असून गुरुवारी सकाळी त्यांचा भाऊ इकबाल मलिक यांना नोटीस देऊन आज (ता. २५) सकाळी ईडी कार्यालयात चौकशी करिता बोलविले आहे. त्यांना मालमत्तेप्रकरणी विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. इकबाल मलिक यांचा भंगार खरेदी विक्रीचा धंदा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..