रामेश्वर शिव मंदिराचा लवकरच कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामेश्वर शिव मंदिराचा लवकरच कायापालट
रामेश्वर शिव मंदिराचा लवकरच कायापालट

रामेश्वर शिव मंदिराचा लवकरच कायापालट

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेकडील लक्ष्मीनगर येथे १९८३ साली कामगार नेते दत्ता सामंत यांनी रामेश्वर शिवमंदिराची स्थापना केली. त्या शिवमंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे.
घाटकोपर तसेच मुंबईतील बहुसंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीला तर भक्तगण मोठ्या संख्येने या मंदिराला भेट देतात. मंदिराच्या नूतनीकरणासाठी विश्वस्तांनी आमदार पराग शाह यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची सर्व जबाबदारी घेतली आहे. शाह सेवाभावी वृत्तीने काम करत असून या कामामुळे स्थानिक नागरिकांना, तसेच घाटकोपर बाहेरून येणाऱ्या भक्तगणांना विशेष फायदा होईल. हे काम आमदार कोणताही शासकीय निधी न वापरता स्वखर्चाने करत आहेत. महाशिवरात्रीनंतर कामास सुरुवात होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top