संवाद कौशल्य मजबूत असणे आवश्‍यक

संवाद कौशल्य मजबूत असणे आवश्‍यक

मुंबई, ता. २६ : मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात होते; पण ते करत असतानाही काहीतरी राहून गेले होते. ते काय याचा विचार केला तेव्हा कळले की मला माझी एक वेगळी प्रतिमा तयार करावी लागेल. दोन हजार वर्कर्स हाताखाली काम करत असताना ते माझे ऐकायचे नाहीत. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, आपल्याला कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. आपले बोलणे, संवाद कौशल्य मजबूत असणे आवश्यक असते, असे मत ‘तर्पण'' संस्थेच्या उद्योजिका व संचालिका  सारिका महोत्रा यांनी यिनच्या अधिवेशनात मांडले. 

आपण आपल्या धावपळीच्या जीवनात काही मूलभूत प्रश्नही स्वत:ला विचारत नाहीत. व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?  स्वत:ची ओळख तर आहेच, पण ती दुसऱ्याच्या नजरेत आणि मनात कशी आहे हे महत्त्वाचे आहे.  तुमचे दिसणे, तुमची देहबोली आणि तुमची नैतिकता यांचे संयोजन म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व असते. इमेजचा अर्थ चार ठळक शब्दांत मांडायचा झाला तर ए - एपिअरन्स, बी- बिहेविअर, सी- कम्युनिकेशन, डी- डिजिटल प्रेझेन्स. तुमच्या वागण्यातील  वृत्ती खूप महत्त्वाची भूमिका  पार पाडते. संवादात, संवाद कौशल्यात आणि दिसण्यातही वृत्ती दिसून येते, असे मार्गदर्शन त्यांनी शॅडो कॅबिनेटमध्ये केले.

संवाद स्पष्ट असावा 
संवाद हा कायम स्पष्ट आणि पूर्ण असावा. एखादी गोष्ट कळली नाही तर प्रश्न विचारले पाहिजेत. फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन ही फ्रेज आपण ऐकतो. एका संशोधनानुसार, जर तुमचे फर्स्ट इम्प्रेशन चुकले तर त्याच व्यक्तीचा आपल्याबद्दलचा विचार बदलण्यासाठी जवळपास २४ वेळा त्या व्यक्तीची भेट घ्यावी लागते. त्यामुळे एकदाच  चांगला प्रयत्न करून त्या व्यक्तीवर प्रभाव पाडणे गरजेचे आहे.  व्यक्तिमत्त्व विकासात संवाद, कौशल्य, वृत्ती, देहबोली आणि  रंग मानसशास्त्र कळणे फार गरजेचे आहे. यातून प्रतिमा व्यवस्थापन करण्याबाबतचे सखोल ज्ञान आणि मार्गदर्शन महोत्रा यांनी सदस्यांना केले. संबंध व्यवस्थापनासाठीही या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com