सीमांकन व विभाजनावर हरकती

सीमांकन व विभाजनावर हरकती

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. या प्रभाग रचनेबाबतच्या हरकती व सूचनांवर शनिवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत अनेक प्रभागांचे चुकलेले सीमांकन, प्रभागातील नागरिकांचे विभाजन, विभाजनाचा विकास कामांवर होणारा परिणाम याबाबत नागरिकांकडून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. तसेच अनेक मुद्द्यांवर हरकती नोंदवण्यात आल्या. त्यामुळे आता प्रभागरचना कशाप्रकारे अंतिम करण्यात येईल, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रभागांचे चुकीचे सीमांकन, सोसायटी आणि झोपडपट्टीचा भाग एकत्र करणे, एक सोसायटी दोन वॉर्डांत कशी विभागली गेली याची माहिती ठाणे पालिकेचे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिली. रस्ते, नाले सोडूनही सोसायटीच्या संरक्षक भिंतीवरून कसे वॉर्ड वेगळे झाले हेदेखील त्यांनी सांगितले; तर नागरिकांनीही या वेळी हरकती नोंदवल्या. काही ठिकाणी प्रभाग क्रमांक ३ च्या नागरिकांचा समावेश थेट पाचमध्ये, प्रभाग क्रमांक ५ च्या नागरिकांचा समावेश ९ मध्ये करण्यात आला आहे, असे नागरिकांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीचे चुकीचे विभाजन केल्याचेही सांगितले.
----
चौकट :
लोकमान्य नगरचे पाच तुकडे
वॉर्डरचना करताना लोकमान्य नगरचे पाच तुकडे करण्यात आले. याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्दशनास आणून दिली. भौगोलिक रचना एक असताना प्रभागरचना कशी वेगळी केली गेली हा प्रश्न त्यांनी विचारला. लक्ष्मी नगरच्या दोन इमारती एका वॉर्डात; तर इतर इमारती दुसऱ्या वॉर्डात गेल्या. शास्त्री नगरही कसा फोडला गेला आहे, हेदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
...
दिव्यावर अन्याय ः महापौर नरेश म्हस्के
कोणाला तरी फेवर करण्यासाठी संपूर्ण ठाणे शहराची प्रभागरचना बदलून दिवा भागावर अन्याय करण्यात आला. मुंब्य्रात ८ प्रभागांत २४ नगरसेवक असणे गरजेचे असताना तिथे ९ प्रभाग करून नगरसेवक संख्या २७ केली. दिवा भागात ९ नगरसेवक असणे गरजेचे आहे, परंतु येथे ७ नगरसेवक झाल्याचा मुद्दा महापौर नरेश म्हस्के यांनी या वेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com