mns
mnssakal media

नवी मुंबई : पालिका निवडणुकीत मनसे खाते उघडणार ?

वाशी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विचार आणि त्यांची भूमिका नवी मुंबईकरांपर्यंत पोहचवून आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत (Navi Mumbai municipal corporation) ७ ते ९ जागांवर विजय मिळवून सत्तेचे स्टिअरिंग हाती ठेवू, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे विचार आणि केलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून मनसेला (MNS) कसे निवडणुकीत खाते खोलता येईल, यासाठी तिकीट कुणाला मिळेल याची वाट न पाहता आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

mns
सरकारकडून लेखी उत्तर येत नाही तोपर्यंत माघार नाही - संभाजीराजे

बेलापूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा आणि शिवजनसंपर्क अभियान, त्याचप्रमाणे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील संत सावतामाळी सभागृह ऐरोली, सेक्टर ५ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बेलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे नेते बाळा नांदगावकर व सरचिटणीस संदीप देशपांडे, तर ऐरोलीत झालेल्या कार्यक्रमात मनसेचे नेते नितीन सरदेसाई व अभिजित पानसे या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने पक्षाची बांधणी सुरू केली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत बेलापूरमधून गजानन काळे आणि ऐरोलीतून नीलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मनसेला जरी विजय मिळाला नसला तरी मतदारांचा कौल मात्र मिळाला होता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसेने नवी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईत पक्षाची भूमिका निर्णायक

मनसेची स्थापना झाल्यापासून ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पक्षाची भूमिका निर्णायक राहिली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा फायदा तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना झाला होता. मनसेने प्रचारामध्ये घेतलेल्या मुद्द्यामुळे विरोधक उमेदवाराला फटका बसून नाईक यांना विजय मिळाला होता. त्यानंतर झालेली पालिका निवडणूक, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीत मनसेने नवी मुंबईतून उमेदवार दिले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com