Tuberculosis
Tuberculosissakal media

पोस्ट कोव्हिडमध्ये टीबीचे रुग्ण वाढले; मागील दोन महिन्यांत ४३४ रुग्ण

रवींद्र खरात ः सकाळ वृत्तसेवा
Published on

कल्याण : कोरोनाची पहिली लाट (corona pandemic) मार्च २०२० मध्ये सुरू झाली. मात्र, आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून येत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या (KDMC) आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी केलेले सर्वेक्षण आणि रुग्णालयामध्ये येणारी क्षयरोग्यांची संख्या (Tuberculosis) पाहता लहान मुलांमध्ये देखील क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०२० साली कल्याण-डोंबिवलीत ३ हजार ३५६ क्षयरोग रुग्ण आढळून आले, तर २०२१ या वर्षात क्षयरोगाचे ४ हजार १९५ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ९ वर्षांखालील ३८ मुले, ३८ मुली, तर १८ वर्षांखालील १८५ मुले आणि ४३५ मुलींचा समावेश आहे.

Tuberculosis
"शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे विरोधकांना सांगायची तयारी"

गेल्या वर्षी क्षयरोगाचे गेल्या वर्षी चार हजार १९५ रुग्ण आढळून आले आहेत. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत ९ वर्षांखालील क्षयरोग असणारी दोन मुले, ४ मुली यांचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांत ४३४ क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच खासगी रुग्णालय अथवा दवाखान्यात क्षयरोगावर रग्ण उपचार घेत असतील तर संबंधित डॉक्टरांनी त्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

क्षयरोग लक्षणे

दोन आठवडे खोकला, वजनात घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे, संध्याकाळी ताप येणे आदी लक्षणे

नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास न घाबरता पालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा, मोफत उपचार केले जातात.
-डॉ. समीर सरवणकर, शहर क्षयरोग अधिकारी.

Tuberculosis
Mumbai : संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

वय क्षयरोग बाधित

९ वर्षांखालील - मुले २२ , मुली ३८
१८ वर्षांखालील - मुले १४१ , मुली २६८
१९ वर्षांवरील - पुरुष १५०४ , महिला १३८१
तृतीयपंथी - २
एकूण ३ हजार ३५६ क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत.

सन २०२१ मध्ये
९ वर्षांखालील - मुले ३८ , मुली ३८
१८ वर्षांखालील - मुले १८५ , मुली ४३५ ,
१९ वर्षांवरील - पुरुष १८३७ , महिला १६५९
तृतीयपंथी -३ ,असे एकूण ४ हजार १९५ क्षय रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत .

१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या काळात
९ वर्षांखालील - मुले २, मुली ४
१८ वर्षांखालील - मुले २३ , मुली ३९
१९ वर्षांवरील पुरुष - १७८ , मुली १८७
तृतीयपंथी - १
एकूण -४३४ क्षय रोग रुग्ण आढळून आले आहेत .

वर्ष मृत्यू
२०१९ - १६९
२०२० - १२८
२०२१ - ९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com