
बदलापूर : परीक्षेला घाबरून विद्यार्थिनीचा अपहरणाचा बनाव; CCTV मुळे बिंग फुटले
बदलापूर : दहावीची परीक्षा (ssc exam) ऑफलाईन (offline) होणार असून कमी गुण मिळतील, या भीतीने बदलापूरमधील विद्यार्थिनीने आपल्या अपहरणाचा बनाव (Student Kidnapping drama) केला; मात्र रेल्वे स्थानकांवरील सीसी टीव्हीच्या मदतीने हे अपहरण झालेच नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. बदलापूर (Badlapur) पश्चिमेकडील मांजर्ली भागात राहणारी दहावीतील विद्यार्थिनी २३ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती; मात्र शाळेत न जाता तिने बदलापूर स्थानकातून लोकलने परळ गाठले.
हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू!
या ठिकाणाहून घरी फोन करत शाळेत जाताना एका काळ्या रंगाच्या कारमधील व्यक्तीने आपले अपहरण करून मुंबईत आणल्याचे सांगितले. दादर येथील शाळेत गेल्यावर अज्ञातांच्या हातून आपण निसटून आल्याचे तिने शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने लागलीच दादर लोहमार्ग पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या तक्रारीनुसार चार अज्ञातांवर अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली.
सीसी टीव्हीमुळे बिंग फुटले
सदर घटनेची माहिती दादर पोलिसांनी बदलापूर पोलिसांना दिली; मात्र मुलीने घटनास्थळी वर्णन केलेली कोणतीही कार दिसून आली नाही. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी बदलापूर व दादर रेल्वे स्थानकांतील सीसी टीव्हीची तपासणी केली असता सदर मुलगी प्रवास करताना दिसून आली. अखेर पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता दहावीच्या ऑफलाईन परीक्षेत कमी गुण मिळण्याच्या भीतीने अपहरणाचा बनाव रचल्याचे कबूल केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..