तिळसेश्वराची यात्रा रद्द
वाडा, ता. २८ (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिळसा येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा यंदाही रद्द करण्यात आली; मात्र भाविकांना मास्क लावून व सामाजिक अंतर ठेवून देवदर्शनाला परवानगी देण्यात आली. पालघर, ठाणे या जिल्ह्यांतून लाखो भाविक तिळशेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला येत असतात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असते. याची दखल घेत वाडा तहसीलदार कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत यात्रेवर बंदी घालण्यात आली असून काही नियमांचे पालन करून भक्तांना शिवदर्शन घेण्यास परवानगी दिली असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून वर्षानुवर्षे भरत आलेली यात्रा रद्द करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.