निरोप समारंभावेळी विद्यार्थी भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोप समारंभावेळी विद्यार्थी भावूक
निरोप समारंभावेळी विद्यार्थी भावूक

निरोप समारंभावेळी विद्यार्थी भावूक

sakal_logo
By

विरार, ता. १ (बातमीदार) ः कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनिअर कॉलेज जूचंद्र येथे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभावेळी मराठी राजभाषा दिनही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चंडिका न्यास ट्रस्टचे अध्यक्ष व स्कूल कमिटी सदस्य हरिहर पाटील, श्री शिवछत्रपती समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष, स्कूल कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, स्कूल कमिटी सदस्य निवृत्ती म्हात्रे, पर्यवेक्षक जितेंद्र भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. निरोप समारंभावेळी विद्यार्थी भावूक झाले होते. सुधीर भोसले, सुजाता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश गवळी यांनी केले; तर सूत्रसंचालन सुरेश सावंत यांनी केले. दीपिका पाटील यांनी आभार मानले.