मानवी तस्करीप्रकरणी चार जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी तस्करीप्रकरणी चार जणांना अटक
मानवी तस्करीप्रकरणी चार जणांना अटक

मानवी तस्करीप्रकरणी चार जणांना अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : बांगलादेशी नागरिकांना अवैधरीत्या भारतात आणणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने दिली. परगणामधील (पश्चिम बंगाल) बानगाव येथील बगदाह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंधराणीचा रहिवासी असलेला सरदार शेख ऊर्फ ​​मोंजील मोंडल हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह पोलिसांनी १७ वर्षीय मुलीसह तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पासपोर्ट एजंट असल्याचा दावा करणाऱ्या संतोष वर्णे (५२, मुंबई) याला बनावट कागदपत्रे, शालेय प्रमाणपत्रे पुरवल्याप्रकरणी अटक केली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..