मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय पांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय पांडे
मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय पांडे

मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय पांडे

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : राज्याचे माजी पोलिस महासंचालक (प्रभारी) संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेल्या हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे. शासकीय आदेशानुसार नगराळे आता राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करतील. संजय पांडे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा मुंबई पोलिस आयुक्त बदलण्यात आले आहेत. यापूर्वी अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे याला अटक झाल्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी महाविकास आघाडी सरकारने हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली होती.

१९८६ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेल्या संजय पांडे यांनी गेल्या एप्रिल महिन्यापासून राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची धुरा सांभाळली होती. प्रभारी म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर राज्य सरकारला पांडे यांना हटवावे लागले. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

महासंचालक ते पोलिस आयुक्त
राज्याच्या पोलिस प्रमुखपदाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबई पोलिस आयुक्त करण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. परंपरेनुसार मुंबईचा पोलिस आयुक्त बढतीवर राज्याचा महासंचालक होतो. मात्र या वेळी ही प्रक्रिया उलट झाली आहे. यापूर्वीही तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची प्रतिनियुक्तीवर केंद्रात सीबीआय प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काही काळ हेमंत नगराळे यांना पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. मुंबई पोलिस आयुक्त हे पद अंत्यत महत्त्वाचे समजले जाते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..