कचरावेचक महिलांसाठी संध्याकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरावेचक महिलांसाठी संध्याकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी
कचरावेचक महिलांसाठी संध्याकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी

कचरावेचक महिलांसाठी संध्याकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी

sakal_logo
By

ठाणे, ता. १ ः कचरावेचक महिला या आपल्या जीवाची पर्वा न करता कचरा गोळा करण्याचे काम करीत असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संध्याकाळच्या वेळी महापालिकेने बाह्यरुग्ण विभाग सुरू करावेत, अशी मागणी ज्योती म्हापसेकर यांनी केली आहे. ठाणे पालिकेच्या समाज विकास विभाग व स्त्री मुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्लास्टिक कचरा न उचलण्याचा विचारही आता सुरू झाला असून तो शासनाकडे मांडला जाणार असून या महिलांच्या परिस्थितीत कशी सुधारणा करता येईल यावर विचार होणे गरजेचे आहे; मात्र नवीन तंत्रज्ञान आल्यावर या महिलांना बाजूला फेकले जात असल्याचा आरोपही ज्योती म्हापसेकर यांनी या वेळी केला. याउलट नवीन तंत्रज्ञानातून खर्च हा वाढत असून कचरावेचक महिला या कचरा गोळा करीत असल्याने ट्रान्स्पोर्टचा खर्चदेखील वाचत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कचरा वेचक महिला या कचरा वेचनाचे काम करीत असल्या तरीदेखील त्यांची मुले कचरावेचकाचे काम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी विविध प्रकारची शिबिरे, कार्यक्रम घेण्याच्या सूचना या वेळी उपमहापौर पल्लवी कदम यांनी दिल्या. तसेच कचरावेचक किंवा ज्या महिला दिवसभर काम करून थकल्यानंतर घरी जात असतील अशा महिलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना सुरू करण्यात आल्याचे उपमहापौर पल्लवी कदम यांनी या वेळी सांगितले.