Sat, March 25, 2023

श्रीगणेश विद्यामंदिरमध्ये विज्ञान दिन साजरा
श्रीगणेश विद्यामंदिरमध्ये विज्ञान दिन साजरा
Published on : 1 March 2022, 10:19 am
धारावी, ता. १ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया विकास संस्था संचलित श्रीगणेश विद्यामंदिर शाळेत सोमवारी (ता. २८) मराठी राजभाषा दिनासोबत राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी दोन ते तीन दरम्यान साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दोन्ही दिवसांचे महत्त्व समाजवण्यात आले. विद्यार्थ्यांनी या वेळी काही प्रश्न विचारून समाधान करून घेतले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर उपस्थित होते.