Thur, March 30, 2023

दुर्गम भागात व्हिल ड्रमचे वाटप
दुर्गम भागात व्हिल ड्रमचे वाटप
Published on : 1 March 2022, 12:17 pm
कासा, ता. १ (बातमीदार) ः जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील कोगदे गावात पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांना दोन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ मुंबई पश्चिम यांच्या सौजन्याने पाणी वाहून नेण्याचे १२० प्लास्टिक व्हिल ड्रमचे आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष विशाल शेट्टी, सचिव पंकज अग्रवाल, सहसचिव जयेश गोयल व मोहन केंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये समता फाउंडेशन संघ जिल्हा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दानशूर व्यक्तींच्या हस्ते ड्रमचे वाटप करण्यात आले. या ड्रमवाटप कार्यक्रमाला जमलेल्या आदिवासी कुटुंबांना सरपंच गणपत भोये, सदस्य जयराम टोके यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीमधील देवराम दळवी, रवी टोकरे, गुरुनाथ जोघारी आदी उपस्थित होते.