Wed, March 29, 2023

कुलाबा युनायटेड संघ विजेता
कुलाबा युनायटेड संघ विजेता
Published on : 1 March 2022, 10:20 am
मुंबादेवी, ता. १ (बातमीदार) ः जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधित कुलाबा येथे झालेल्या फुटबॉल सामन्याच्या अंतिम रोमहर्षक लढतीत अवघ्या एका गोलने कुलाबा युनायटेड संघाने बाजी मारीत सीडब्लूसी संघावर विजय मिळविला. ९० मिनिटे खेळला गेलेल्या या अतितटीच्या सामन्यात सायंकाळी दिव्यांच्या प्रकाशात पेनल्टी शूटआऊटच्या सुवर्ण संधीचे रूपांतर गोलमध्ये करण्यात कुलाबा युनायटेड संघाला यश मिळाले आणि सबिना चंद्रशेखर मैदानात उपस्थित पंधराशे क्रीडाशौकिनांनी एकच जल्लोष केला. बक्षीस समारंभ तेजस्विनी जगताप प्रियांका चोरगे आणि रमेश रणपिसे यांच्या हस्ते पार पडला. प्रथम विजेता व द्वितिय विजेता संघास मराठी भाषा चषक व रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले. येत्या ८ मार्चला महिला दिनास महिलांचे फुटबॉल सामने आयोजित करू, असे रणपिसे यांनी सांगितले.