जैन कन्याशाळेत विज्ञान आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन कन्याशाळेत विज्ञान आविष्कार
जैन कन्याशाळेत विज्ञान आविष्कार

जैन कन्याशाळेत विज्ञान आविष्कार

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः पंडित रत्न चंद्र जैन कन्या शाळा-घाटकोपर येथे २८ फेब्रुवारीला विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला गेला. सुवर्णा सावंत व मुख्याध्यापिका नंदाबेन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाने ‘वैज्ञानिकांचे अद्भुत रहस्य’ हा उपक्रम बवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज एक वैज्ञानिकाची माहिती देणारा विद्यार्थिनीचा व्हिडिओ युट्युबच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. शिक्षिका प्रमोदिनी पटेल, दीप्ती देसाई व दक्षा रोकडे यांनी व्हिडीओ तयार केले.