दाऊदच्या हस्तकाची पाठराखण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाऊदच्या हस्तकाची पाठराखण
दाऊदच्या हस्तकाची पाठराखण

दाऊदच्या हस्तकाची पाठराखण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना मुख्यमंत्र्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. ईडीच्या आरोपपत्रात मलिक यांचे दाऊद इब्राहीम याच्यासोबत आर्थिक व्यवहार झाल्याचे म्हटले आहे, तरीही संपूर्ण ठाकरे सरकार त्यांच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. ठाकरे सरकार दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करत असून महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत केला.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ठाकरे सरकारमधील नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर अनेक मंत्र्यांचे आर्थिक गैरव्यवहार लवकर समोर येतील. नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत आहेत; तर मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोप भांडारी यांनी केला. या पत्रकार परिषदेला आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका अर्चना मणेरा, शहर सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदी उपस्थित होते.

केवळ मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणी केली. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याऐवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा उपरोधिक सल्लाही भांडारी यांनी ठाकरे सरकारला दिला.