सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभारणार
सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभारणार

सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभारणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवर सुधारणा करण्यात येत आहेत. या तिन्ही टर्मिनसची प्रवासी क्षमता वाढवण्यावर आणि जादा डब्यांची एक्स्प्रेस उभे राहणारे फलाट तयार करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे.
या तिन्ही टर्मिनसच्या विकासकामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे; तर सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी करण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. या कामांसाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या सुमारे १०० मेल-एक्स्प्रेसच्या फेऱ्या होतात. फलाटांचे विस्तारीकरण झाल्यास जादा डब्यांच्या एक्स्प्रेसची सुविधा प्रवाशांना मिळेल. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या विस्तारीकरणासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
...