सहा लाखांच्या प्लास्टिक दाण्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा लाखांच्या प्लास्टिक दाण्यांची चोरी
सहा लाखांच्या प्लास्टिक दाण्यांची चोरी

सहा लाखांच्या प्लास्टिक दाण्यांची चोरी

sakal_logo
By

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील राहनाळ गाव परिसरातील श्री साई सद्‍गुरू कम्पाऊंडमधील सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या गोदामातील सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या प्लास्टिक दाण्याचा माल चोरट्यांनी पळवला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या गोदामाची भिंत फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामात एक्सॉनमोबिल कंपनीच्या प्लास्टिक दाण्याचा ३,६२५ किलो माल चोरी केला. सुमारे सहा लाख ५० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे उघडकीस येताच गोदाम व्यवस्थापक विशाल कुंभार यांनी भिवंडी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील करीत आहेत.