
कल्याण: सिग्नल तोडल्यास ई चलनाचा दणका; बेशिस्त वाहनचालकांविरोधात मोहीम
कल्याण : कल्याणमधील सिग्नल तोडणाऱ्या (Traffic signal rules) बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) मोहीम सुरू केली आहे. सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांचा सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून वाहतूक पोलिस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे सिग्नल तोडण्यात दुचाकीस्वार सगळ्यात पुढे असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. सिग्नल तोडणाऱ्यांना ई-चलनाच्या (E-Challan Fine) माध्यमातून दंड करण्यात येत आहे.
हेही वाचा: कासा बाजारपेठेत भुरट्या चोराचा सुळसुळाट; किमती कपडे व रोख रक्कम घेवून पाबोरा
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्प शहरातील सिग्नलवर सीसी टीव्ह लावण्यात आले आहेत. सीसी टीव्हीमार्फत सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन पद्धतीने ई-चलन कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाच्या १५ कर्मचारी वर्गाने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
पहिल्या टप्प्यात कल्याण पश्चिममध्ये आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो, कल्याण पूर्वमधील आनंद दिघे चौक आदी पाच ठिकाणी ई चलान कारवाईला सुरुवात झाली आहे.
चार दिवसांत ८०९ वाहनांवर कारवाई
फेब्रुवारी महिन्यात २२ ते २५ तारखेदरम्यान सिग्नल तोडणाऱ्या वाहनांवर ई-चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल ८०९ वाहनांवर कारवाई केली गेली. यामध्ये सिग्नल तोडणारे तब्बल ५१५ जण हे दुचाकीस्वार होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..