
मुलांच्या लसीकरणात वसई-विरार पालिका सरस; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
विरार : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) कमी झाला आहे; मात्र तरीदेखील लसीकरण मोहीम (vaccination drive) वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभर सुरू असलेल्या मुलांच्या लसीकरणात वसई-विरार पालिका (vasai-virar municipal) दुसऱ्या क्रमांकावर आहे. वसई-विरारमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना १०० टक्के पहिला डोस देण्यात आला आहे; तर दोन्ही डोस मिळून एक लाख २६ हजार १४३ लसीकरण झाले आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत आतापर्यंत ८४ हजार ८६३ मुलांनी पहिला डोस (first vaccination dose) घेतला आहे; तर ४१ हजार २८० मुलांनी दुसरा डोस घेतला आहे.
हेही वाचा: राज्यपालांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन
मुलांच्या लसीकरणाबरोबरच इतर वयोगटातील लसीकरणातदेखील वसई-विरार पालिका आघाडीवर आहे. आतापर्यंत नऊ लाख ८३ हजार नागरिकांची पहिला डोस पूर्ण केला होता. आतापर्यंत ९७.३ टक्के लसीकरण झाले आहे.
वसई-विरार पालिका हद्दीत १०० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे.
- डॉ. भक्ती चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वसई-विरार पालिका
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..