
झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू
ठाणे, ता. ४ : सावरकर नगर येथील आई माता मंदिर येथे झाडाची छाटणी करीत असताना, एका कामगाराचा झाडावरून खाली पडून गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. वृक्ष छाटणीचा ठेका डिसेंबरमध्येच संपुष्टात आला असतानाही कोणाच्या सांगण्यावरून ही वृक्ष छाटणीची कामे केली जात आहेत, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. त्या कामगाराच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल देखील नगरसेवक एकनाथ भोईर यांनी उपस्थित केला. या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल करीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराचा ठेका हा डिसेंबर महिन्यात संपल्याचे सांगितले. मात्र बजेट उपलब्ध नसल्याने नव्याने निविदा काढण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नगरसेवकाच्या मागणीनुसार हे काम करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..