Coronavirus Update
Coronavirus UpdateSakal Digital

कल्याण डोंबिवलीकर अजूनही निर्बंधात, जाणून घ्या कारण

डोंबिवली, ता. ६ : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या कमालीची घटली आहे. शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण पालिका हद्दीत आढळून आला नाही. कोरोनामुक्तीकडे शहराची वाटचाल सुरू असली, तरी निर्बंधमुक्तीसाठी मात्र अजून नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या निकषानुसार लसीकरणाची टक्केवारी, कोरोना चाचण्या पॉझिटिव्हिटी रेट या नियमांत कल्याण-डोंबिवली महापालिकेला अद्याप उद्दिष्ट पूर्ण करता आले नसल्याने या क्षेत्रातील निर्बंध अद्याप कायम आहेत. (why kalyan dombivli still under covid restriction)

कल्याण-डोंबिवलीत तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होती; मात्र मृत्यूचे प्रमाण जानेवारीत वाढल्याने एक वेगळेच आव्हान पालिका प्रशासनासमोर उभे राहिले होते; मात्र गेल्या महिन्याभरापासून पालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही शून्यावर आले आहे. शुक्रवारी ४ मार्चला पालिका हद्दीत प्रथमच कोरोना रुग्णच आढळून आला नाही; तर शनिवारीही केवळ एक रुग्ण आढळून आला आहे.

Coronavirus Update
मुंबई : ओमिक्रॉनची चाचणी जलद होणार

कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी काही निकष जारी केले आहेत. या निकषांमध्ये महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिका या निकषांच्या पूर्ततेत बसत असल्याने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर, शहापूर, ग्रामीण भागातील निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत.

गेल्या दहा दिवसांतील कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे पाचवरून शून्यावर आले आहे. सध्या केवळ १६ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी पालिकेने शासकीय केंद्रांसोबतच खासगी रुग्णालयांतून सशुल्क लसीकरण, मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने झोपडपट्टी परिसरात लसीकरण, खासगी कार्यालये, संस्थांच्या माध्यमातून लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण अशा अनेक उपाययोजना राबविल्या. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचेही दिसून आले आहे. असे असतानाही निर्बंधमुक्तीसाठी आवश्यक असलेले लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात पालिका प्रशासन मागे का पडले, असा प्रश्न विचारला जात आहे. याविषयी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. तसेच पालिका प्रशासनातील कोणीही या विषयावर बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले.

Coronavirus Update
कल्याण VIRAL VIDEO : प्रेमाचा संशय, कारचालकाने नेले तरुणाला फरफटत

निर्बंधमुक्तीसाठी निकष
- पहिला डोस लसीकरण ९० टक्के (१८ वर्षांवरील लोकसंख्या)
- दुसरा डोस लसीकरण ७० टक्के (१८ वर्षांवरील लोकसंख्या)
- पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी
- रुग्णव्याप्त ऑक्सिजन खाटा ४० टक्क्‍यांपेक्षा कमी

१६ जानेवारी २०२१ ते १ मार्च २०२२

पहिला डोस घेतलेल्यांची संख्या - १० लाख ९९ हजार ४६५
दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या - १० लाख २४ हजार १३३
बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्या - २१ हजार ४४५
एकूण - २१ लाख ४५ हजार ४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com