राज्यपालांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; 'या' पक्षाने घेतला आक्रमक पवित्रा | Bhagat Singh Koshyari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat-singh-koshyari
राज्यपालांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

राज्यपालांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; 'या' पक्षाने घेतला आक्रमक पवित्रा

शहापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक तसेच तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांच्याविरोधात गुन्हा दाखल (police FIR demand) करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलिस स्टेशनमधील (Shahapur police station) अधिकाऱ्यांना देण्यात आले.

हेही वाचा: रायगड : आठवडा बाजारांमुळे अर्थचक्राला वेग; ५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल

यावेळी शहर अध्यक्ष किशोर भोईर, सल्लागार वामन केदार, सचिव प्रसाद भोईर, शहर उपाध्यक्ष नरेश भोईर, शहर सचिव सचिन कुंभार, उपाध्यक्ष धनाजी वरकुटे, महिला उपाध्यक्षा प्रमिला गगे, भारती फनारे, युवा सचिव निखिल भोईर, युवा आघाडीचे अखिल शेख, सोमनाथ तेळवणे, अरविंद गोडे, मयूर किरपण, संदेश सरखोत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top