GST fraud
GST fraudsakal media

नवी मुंबई : बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी फसवणूक; तिघांना अटक

नवी मुंबई : पंधरापेक्षा अधिक बनावट कंपन्या (Fake companies) तयार करून तब्बल १८० कोटींहून अधिक रकमेच्या बनावट पावत्यांचा वापर करून सुमारे ३३ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱ्या २९ वर्षीय मास्टरमाईंडला सीजीएसटी रायगड (CGST Raigad) आयुक्तालयाने पनवेल येथून अटक (culprit arrested) केली. रायगड येथील सीजीएसटी आयुक्तालयाने गेल्या पंधरवड्यात केलेली ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.

GST fraud
शहरातील कोविड केअर केंद्र बंद; नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय

तळोजा, कळंबोली तसेच पनवेल परिसरात बनावट कंपन्यांच्या संख्येवर रायगड सीजीएसटीचे अधिकारी डेटा विश्लेषण साधनांच्या आधारे, तसेच कंपन्याच्या गेल्‍या काही वर्षातील आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून होते. पनवेलमधील कंपनीचे व्यवहार संशयास्पद आढळल्‍याने रायगड सीजीएसीच्या अधिकार्‌यांनी ४ मार्च रोजी छापा मारला. या वेळी बीएमएस पदवीधर असलेल्या २९ वर्षीय तरुणाने पंधरापेक्षा अधिक बनावट कंपन्या तयार केल्‍याचे आढळले. या कंपन्याच्या माध्यमातून त्याने तब्बल १८० कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या बनावट पावत्यांचा वापर करून सुमारे ३३ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविल्याचे उघड झाले आहे.

अधिक चौकशीत तरुणाने बनावट कंपन्या व पावत्यांचा वापर करून इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविल्याचे कबूल केले. त्यानंतर सीजीएसटी रायगड विभागाने तरुणाला केंद्रीय वस्तू व सेवा अधिनियम, २०१७ च्या कलम ६९ अन्वये पनवेलमधून अटक केली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पंधरावड्यातील तिसरी कारवाई

रायगड येथील सीजीएसटी आयुक्तालयाने गेल्‍या पंधरवड्यात केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी मेटल स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या कळंबोली येथील मेसर्स अशोक मेटल स्क्रॅप कंपनीवर, त्यानंतर मेसर्स झैद एंटरप्रायझेस या कंपनीवर कारवाई करून दोन्ही कंपन्याच्या मालकांना अटक केली होती. दोन्ही कंपन्यांनी १३५ कोटींपेक्षा अधिक रुपयांची बनावट चलान वापरून सुमारे २५ कोटींचे अवैध आयटीसी मिळविल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सीजीएसटी रायगड विभागाने पनवेलमधील तरुणाला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com