चार हजार आरोग्यसेविका आझाद मैदानात धडकणार; महिलादिनी भिक मागो आंदोलन
मुंबादेवी : सद्यस्थितीत आठ तास काम करून अवघे नऊ हजार मासिक वेतन (Monthly salary) मिळते, ते १८ हजार रुपये करावे, या मागणीसाठी मुंबई महापालिकेच्या (bmc) चार हजार आरोग्यसेविका (सी.एच.व्ही.) आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International women's day) आझाद मैदानात भिक मागो आंदोलन (Begging strike) करणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका कर्मचारी महासंघ म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास (Adv Prakash Devdas) यांनी ही माहिती दिली.
आपल्या मागण्यांसाठी आरोग्यसेविका रस्त्यावर उतरणार आहेत. आरोग्य सेविकांनी गेले साधारण तीन वर्षे कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता यशस्वी लढा दिला. या काळात या चार हजार महिला आरोग्य सेविकांनी उत्तम काम केले. या दिवशी मोठमोठे कार्यक्रम आखले जातात, परंतु आपल्याच महापालिकेमध्ये चार हजार महिला आरोग्य सेविकांची पिळवणूक केली जाते, याची जाण राज्य शासनाला व मुंबई पालिकेला व्हावी यासाठी हे आंदोलन आहे, असे देवदास यांनी सांगितले.
नेमके मुद्दे कोणते ?
आरोग्य सेविका गरोदर असेल तर व तीन महिने गैरहजर असेल तर तिला घरी पाठवतात. आरोग्य सेविका ३० वर्षे सेवा केल्यावर रिटायर झाली असता एक रुपयाही देण्यात आला नाही. संघटनेने केलेला अर्ज ट्रीबुनलने मान्य करून महिला आरोग्यसेविका मुंबई पालिकेचे कर्मचारी आहेत असा निर्णय दिला. उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम केला. पालिका वकिलांसाठी हायकोर्टात करोडो रुपये खर्च करते आणि आता सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. पालिका म्हणते, आरोग्यसेविका मुंबई मनपाच्या कर्मचारी नाहीत त्या कंत्राटी कामगार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले पाहिजे, असे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.