वसई पालिका मुख्यालयाला आग
विरार (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांची सभा सुरू होती. या वेळी सभागृहाजवळ असलेल्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. काही कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगत आग नियंत्रण उपकरणाने आग विझविली. त्यानंतर अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली. या आगीत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. यापूर्वीही पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.