Women's trekking at karnala fort
Women's trekking at karnala fortsakal media

पनवेल : नऊवारी नेसून हिरकणींनी शिवगर्जना देत केला कर्नाळा किल्‍ला सर

पनवेल : महिला दिनानिमित्त (International women's day) अस्सल मराठमोळी वेशभूषा नऊवारी साडी (Nauwari saree) परिधान करून दिशा मंचच्या हिरकणींनी शिवगर्जना देत कर्नाळा किल्‍ला (Karnala Fort) सर केला. आज प्रत्‍येक क्षेत्रात महिलांनी आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाचा ठसा उमटवला आहे. ट्रेकिंगमध्येही महिला (women's trekking) मागे नाहीत, हे मंगळवारी महिलांनी दाखवून दिले. गड, किल्ले हा महाराष्‍ट्राला लाभलेला ऐतिहासिक ठेवा आहे. या ऐतिहासिक संपत्तीच्या (Forts in Maharashtra) जतनाच्या मागणीसाठी दिशा मंचच्या वतीने कर्नाळा किल्‍ल्‍यावर महिला दिनाचे औचित्‍य साधून ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते.

Women's trekking at karnala fort
ठाण्याला साथीच्या आजाराचा धोका; औषधफवारणी करण्याचे दिले आदेश

विशेष म्‍हणजे मराठमोळी नऊवारी साडीत हा संकल्‍प पूर्ण करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता. त्‍यामुळे किल्‍ल्‍यावर येणाऱ्या पर्यटकांकडूनही त्‍यांचे कौतुक करण्यात आले. किल्ला सर करताना प्रत्‍येकीच्या अंगात जणू हत्तीच बळच संचारलेले दिसत होते. किल्ल्यावर पोहोचल्यावर दीपा खरात यांच्या शिवगर्जना दिली. राजमाता जिजाऊच्या जयघोषाने किल्‍ला परिसर दुमदुमला होता.

या वेळी विद्या मोहिते यांनी इतिहासातील महिलांची यशोगाथा व त्यांचा आदर्श घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तुंगा ट्रेकिंग संस्‍थेचे विवेक पाटील व गणेश गजरे यांच्या मार्गदर्शनाने खुशी सावर्डेकर, कल्याणी ठाकरे, दीपा खरात, अनिता मागाडे, अरुणा शिरसाटे, अपर्णा कांबळे, रीना पवार, मंगल कानडे यांनी पारंपरिक वेशभू्षा परिधान करून किल्ला सर केला.

Women's trekking at karnala fort
प्रकल्पग्रस्तांना मिळाला चारपट मोबदला; संतोष ठाकूर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

किल्ल्याचा निसर्गरम्य परिसर, गड बांधणी, पाण्याचा संचय, रस्त्याची चढण, भिरभिरणारी फुलपाखरे, पक्ष्यांचा किलबिलाट, गर्द झाडी, काही ठिकाणी झालेली पाणगळ आदी पाहून कर्नाळा किल्‍ला सर केल्‍याची मेहनत सार्थकी लागल्‍याचे वाटले.
- नीलम आंधळे, संस्‍थापक, दिशा मंच

ट्रेकिंग संस्‍थेचे विवेक पाटील व गणेश गजरे यांच्या मार्गदर्शनाने खुशी सावर्डेकर, कल्याणी ठाकरे, दीपा खरात, अनिता मागाडे, अरुणा शिरसाटे, अपर्णा कांबळे, रीना पवार, मंगल कानडे यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून किल्ला सर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com