मनोर : विवाह्यबाह्य संबंधातून पतीची हत्या; पत्नीला अटक | Manor crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
विवाह्यबाह्य संबंधातून पतीची हत्या

मनोर : विवाह्यबाह्य संबंधातून पतीची हत्या; पत्नीला अटक

मनोर : विवाह्यबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या (Murder case) करणाऱ्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. वरई-पारगाव रस्त्यावर मनोर गावच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी मृतदेह आढळून आला होता. त्या व्यक्तीची हत्या झाली असून यात त्याच्या पत्नीसह इतर चार जण सामील असल्याचे तपासात (police investigation) उघड झाले आहे. मनोर पोलिस ठाण्याच्या (Manor police station) गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी शितल पांचाळ, तिचा प्रियकर नरेश बोधानी (वय ३१), राकेश आरावंदेकर (२७), अजय मातेरा (३०) आणि सतीश हवसारे (२४) (culprit arrested) यांना अटक केली आहे.

हेही वाचा: विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

मनोर येथे आढळलेल्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. हा मृतदेह दिनेश पांचाळ (वय ४५) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिनेश पांचाळ ठाणे शहरातील खोपट भागातील एसटी वर्कशॉप जवळच्या लक्ष्मी नारायण अपार्टमेंट राहत होता. त्याची पत्नी शीतल हिचे नरेश बोधानी याच्यासोबत विवाह्यबाह्य संबंध होते. या संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांनी दिनेशची हत्या करण्याचा कट आखला. त्यानुसार नरेश आणि त्याचे मित्र राकेश आरावंदेकर, अजय मातेरा आणि सतीश हवसारे दिनेशला बहाणा करून बाहेर घेऊन गेले.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरून गुजरातकडे जात असताना खाणीवडे टोल नाक्याजवळ चौघांनी दिनेशचा गळा आवळून खून केला. मृतदेह वरई-पारगाव रस्त्यावर टाकून ते फरार झाले. मनोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी केलेल्या तपासात ही बाब उघड झाली. गुन्ह्याच्या तपासात पोलिस नाईक शिवाजी भोईर, उत्तम बिरारी, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeMumbai