नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

रोहा, ता. ३० (बातमीदार) : नगर परिषद व नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास २ मे २०२२ रोजीपासून काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांनी दिला आहे. सहायक वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करावे, अनुकंपा योजना लागू करावी, लाड-पागे कमिटी वारस हक्काने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार पदावर घेण्याकरिता सुधारित शासन निर्णय काढून सफाई कामगार पदावर घ्यावे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

रोहा नगर परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात २८ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींमधील सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासमवेत सर्व नगरपालिका व नगर पंचायत कामगार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनची रायगड जिल्हा संघर्ष समितीची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या कमिटीचे अध्यक्ष म्हणून राकेश पाटील, उपाध्यक्ष दिलीप सोनावणे व मंगेश पाटील, चिटणीस रवींद्र आयनोडकर, कोषाध्यक्ष राहुल गायकवाड, सहकोषाध्यक्ष जयेश भांबरकर; तर समिती सदस्य म्हणून सचिन दळवी, गणपत मोरे यांची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..