२४ हजार नागरिकांना महापालिका योजनांचा लाभ

२४ हजार नागरिकांना महापालिका योजनांचा लाभ

Published on

ठाणे, ता. ३० ः समाज विकास विभागाच्या राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ आता २४ हजार नागरिकांना मिळणार आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर १२ कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. या योजनांसाठी १४ हजार ८५४ लाभधारकांची मर्यादा ठेवण्यात आली होती; पण १० हजार अधिक अर्ज आले होते. त्यामुळे हे सर्व अर्ज ग्राह्य धरले जावेत, अशी विनंती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत या योजना राबविल्या जातात. यासाठी १४ हजारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पण जास्त अर्ज प्राप्त झाल्याने काही अर्जदार या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे निधीची वाढीव तरतूद करण्याची मागणी केली होती. ही मागणी प्रशासनाने मान्य केली असून विविध योजनांमध्ये पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. या योजनांचा लाभ निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती व समाजातील उपेक्षित तृतीयपंथी नागरिकांनादेखील होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com