Bhatsa dam
Bhatsa damgoogle

ठाणे पालिकेला भातसा धरणातून पाण्याची प्रतीक्षा; 'या' विभागाकडून ग्रीन सिग्नल नाही

ठाणे : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal corporation) हद्दीत पाणी समस्या सुटावी याकरिता बारवी, भातसा धरणातून (Barvi and bhatsa dam) प्रत्येकी १०० एमएलडी अतिरिक्त पाणी घेण्यास तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती; तर पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी जलसंधारण विभागाच्या सचिवांना ठाणे महापालिकेला हे अतिरिक्त पाणी उपलब्ध करू न देण्याबाबत सूचना केली होती. असे असताना अद्यापही भातसातून मिळणाऱ्या वाढीव पाण्याबाबत जलसंपदा विभागाकडून ग्रीन सिग्नल (Green Signal) मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Bhatsa dam
"पोलीस कुटुंबियांचे पुनर्वसन झाल्याशिवाय तडकाफडकी त्यांना बाहेर काढू नये"

आजघडीला ठाणे महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून दररोज ४८८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यात भातसा धरणातून २००, एमआयडीसीकडून ११०, स्टेम ११३ आणि मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्ष लिटर असा पाणीपुरवठा होतो. ठाणे महापालिकेच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वीच भातसा आणि बारवीकडून अतिरिक्त पाणी घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार भातसा आणि बारवीमधून त्यांना प्रत्येकी १०० दशलक्ष लीटर पाणी घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे, परंतु तीन वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

भातसामधून पाणी उचलण्यासाठी पालिकेने २०१६ पासून पत्रव्यवहार केला आहे. याच कालावधीत बारवीमधून पाणी उचलण्यासाठीदेखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, परंतु त्यानंतरही आजतागायत अतिरिक्त पाणी ठाणे महापालिकेला उपलब्ध होऊ शकलेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील हे वाढीव पाणी देण्याची हमी दिली होती; मात्र अद्यापही त्याबाबतीत ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.

पंपासाठी ३० कोटींचा खर्च

भातसामधून वाढीव १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी पाचपैकी दोन अधिक क्षमतेचे पंप बसवण्यात आले आहेत. त्यानंतर आता आणखी दोन पंपांचे काम पूर्ण झाले असून एका पंपाचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती पालिकेने दिली. या पंपासाठी ३० कोटींचा खर्च केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com