rope way
rope waygoogle

मुंबई : शिवडी- घारापुरी रोपवेचे काम सुरू होणार? ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प

मुंबई ‌: पुरातत्त्व खात्याची परवानगी मिळताच शिवडी-घारापुरी बेट (Sewri-Gharapuri island) या रोप-वे (Rope way) सेवेच्या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. तसेच मुंबई-बेलापूर मार्गावर (Mumbai-belapur way) सौरऊर्जेच्या नौका चालवण्याचाही विचार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट अॅथॉरिटीचे (mumbai-port authority) अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी आज दिली. सागरमाला प्रकल्पाची माहिती देताना ते आज पत्रकारांशी बोलत होते. सुमारे आठ किलोमीटर लांबीचा ७०० कोटी रुपयांचा शिवडी-घारापुरी बेट रोप-वे प्रकल्प आहे.

rope way
ठाणे पालिकेला भातसा धरणातून पाण्याची प्रतीक्षा; 'या' विभागाकडून ग्रीन सिग्नल नाही

त्यामुळे पर्यटकांना घारापुरी बेटावर जाण्याचा सोपा व आकर्षक मार्ग उपलब्ध होईल. तसेच यामुळे बोटीने जाण्याचा त्रास आणि वेळ वाचेल व पर्यावरणाची हानीही होणार नाही. यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाची फाईल मंजुरीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि पर्यावरण खात्याकडे गेली आहे. यापैकी पुरातत्त्व खात्याची परवानगी महत्त्वाची आहे.

घारापुरी बेटावर पुरातन लेणी असल्यामुळे पुरातत्त्व खात्याच्या परवानगीवाचून हा प्रकल्प थांबला आहे. ही मंजुरी कधी मिळेल, ते ठाऊक नाही. या दोन्ही मंजुरी मिळताच या कामाच्या निविदा काढून काम त्वरेने पूर्ण केले जाईल. ही रोप-वे घारापुरी येथे डोंगरावर उतरणार नाही. तेथील जेटीच्या शेजारी जमिनीवरच रोपवे उतरेल, असेही जलोटा म्हणाले.

rope way
रायगड : आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊनही कारवाई शुन्य; गुन्हा दाखल नाही

मोठ्या बोटी सुरू करणार

मुंबई-बेलापूर वॉटर टॅक्सीला सध्या पर्यटकांचा व प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. सध्या या सेवेला मागणी कमी आहे, तरीही नागरिकांनी प्रवास करावा म्हणून त्याचे दर कमी ठेवण्यात आले आहेत. मागणी वाढली, की या मार्गावर मोठ्या बोटीही सुरू केल्या जातील, असेही जलोटा म्हणाले.

मुंबई-बेलापूर सौरऊर्जा नौका

पर्यावरणाची हानी होऊ नये; तसेच प्रवास खर्च कमी व्हावा म्हणून मुंबई-बेलापूर मार्गावर सौरऊर्जेवर चालणाऱ्या नौका आणायचा विचार आहे. सध्या कोचिन बंदरात अशा काही नौकांच्या चाचण्या सुरू आहेत. या नौका मुंबईत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याने इंधनावरील खर्च कमी झाल्याने प्रवास खर्च कमी होईल आणि नंतर या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, असेही जलोटा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com