
तिळसेश्वर महादेवाच्या स्वयंभू मूर्तीमुळे प्रख्यात; महिलांचा दारू दुकानास विरोध
वाडा : तालुक्यातील तिळसे (Tilase) हे गाव तिळसेश्वर महादेवाच्या स्वयंभू मूर्तीमुळे प्रख्यात आहे. या गावात दारूचे दुकान (wine shop) उघडल्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या असून त्यांनी दुकानाला तीव्र विरोध केला आहे. दारूच्या दुकानामुळे तरुण मुले व्यसनी (teenager alcohol addiction) होतील अशी भीती महिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द (license cancel demand) करावा, अशी मागणी महिलांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
हेही वाचा: मुंबई : शिवडी- घारापुरी रोपवेचे काम सुरू होणार? ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प
तिळसे हे प्राचीन काळापासून नावलौकिक असलेले गाव आहे. येथे पुरातन शिवमंदिर आहे. यामुळे पंचक्रोशीत या गावाला आदराचे स्थान आहे. महाशिवरात्र, होळी या दोन दिवशी येथे मोठ्या यात्रा भरतात. हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे आहेत.
कुंडातील देवमासे भाविकांना शिवरात्री व होळी या दोन दिवशी दिसतात. या मंदिराचा संबंध भारतातील १२ ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या गेलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ असल्याची गावकऱ्यांची मान्यता आहे. त्यामुळे अशा पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गावाचे पावित्र्य दारूच्या दुकानामुळे नष्ट होईल अशी गावकरी व महिलांची भावना आहे. म्हणून दुकानाचा परवाना करण्यात यावा, अशी मागणी महिला व ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..