अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
esakal

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

न्यायालयाने या आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली

नवी मुंबई : उलवे सेक्टर-५ मधील एका सलून चालकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याची माहिती त्याला दिल्यानंतर धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित मुलीने सदर प्रकाराची माहिती आईला दिल्यानंतर एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नुरआलम (शब्बीर) नजीर शाह (वय ३०) याच्याविरोधात बलात्कार आणि पोक्सोच्या कलमाखाली गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने या आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com