dance bar
dance barsakal media

सीबीडीतील सुनील बारवर छापा; व्यवस्थापकासह बारबालांवर कारवाई

नवी मुंबई : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बारवर सीबीडी पोलिसांनी (cbd police) शुक्रवारी रात्री छापा मारून महिला वेटरसह बारचा व्यवस्थापक अशा एकूण नऊ जणांना ताब्यात (Nine people arrested) घेण्याची कारवाई केली. या सर्वांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Filed) करण्यात आला आहे. सीबीडीतील आग्रोळी गाव येथील सुनील बार (Sunil Bar) हा निर्धारित मुदतीपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

dance bar
कल्याणमध्ये मनसेकडून हनुमान चालीसा पठण

त्यानुसार सीबीडी पोलिसांनी रात्री ११.३० वाजता या बारमध्ये जाऊन पाहणी केली. या वेळी बार ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याचे आढळून आले. तसेच बारमधील महिला वेटर या अंगविक्षेप करून अश्‍लील हावभाव करत नृत्य करताना आढळून आल्या. याप्रकरणी सहा महिलांसह दोन वेटर आणि बारच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com